 |
 |
मुलांच्या कौटुंबिक सोयीसाठीमाता-पित्यांची ताटातूट करणे योग्य आहे का? सांगता येत नाही
लोकमत न्यूज नेटवर्क। दि. ३0
‘ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, मोठं केलं, तुमच्यासाठी आयुष्याचा क्षण अन् क्षण वेचून तुमचं आयुष्य मार्गी लावलं, प्रसंगी तुमच्यासाठी स्वत:च्या आशाआकांक्षा बाजूला ठेवून चंदनापरी ते झिजले, अशा माता-पित्यांना स्वत:पासून दूर ठेवू नका, त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या,’ अशी आर्त आणि भावनिक साद महाराष्ट्रातील तरुण पिढीने घातली आहे. ‘लोकमत’च्या राज्यव्यापी सर्वेक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या या हाकेच्या बाजूने ८५ टक्के लोक उभे राहिले आहेत. १0 टक्के लोकांना हे मान्य नाही, तर ५ टक्के तरुणांनी यावर मत न नोंदविणेच पसंत केले.
‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिना’निमित्त ‘लोकमत’ने राज्यव्यापी सर्वेक्षण केले. महाराष्ट्रातील विविध भागांतील ९,५0९ लोकांशी व ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली.
‘लोकमत’ची सर्व विभागीय कार्यालये, आवृत्ती कार्यालये, जिल्हा आणि तालुका प्रतिनिधींच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या सर्वेक्षणात तरुण पिढी व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र प्रश्नावलींच्या आधारे विविध मुद्दय़ांवर या सर्वांची मते जाणून घेतली. तरुण पिढीसाठी केलेल्या सर्वेक्षणात ७५ टक्के लोकांना संयुक्त कुटुंब पद्धती हिताची वाटते. १८ टक्के लोकांना ती हिताची वाटत नाही, तर या प्रश्नी ७ टक्के लोक तटस्थ राहिले. मुलांच्या संपत्तीतील, उत्पन्नातील काही टक्के वाटा माता-पित्यांना मिळावा, असे ७७ टक्के लोकांना वाटते. १३ टक्के लोकांना वाटा मिळू नये असे वाटते, तर १0 टक्के याबाबत तटस्थ राहिले.
तंत्रज्ञानयुक्त बदलत्या नव्या युगातही ज्येष्ठ नागरिक लहान मुलांसाठी संस्कार विद्यापीठ आहेत, असे ८१ टक्के लोकांना वाटते. १३ टक्के लोकांना तसे वाटत नाही, तर ६ टक्के लोकांनी याबाबत काहीच मत व्यक्त केले नाही. माता-पित्यांना विस्थापित करणार्यांना कठोर शिक्षा व्हावी असे ८0 टक्के लोकांना वाटते, तर अशी शिक्षा होऊ नये, असे १२ टक्के लोकांना वाटते. ८ टक्के लोक याबाबत तटस्थ राहिले. वयोवृद्धांना अडगळीत टाकणे योग्य नाही, असे ९२ टक्के लोकांना वाटते. ५ टक्के लोकांना हे योग्य वाटते, तर या प्रश्नी ३ टक्के तटस्थ राहिले.
निराधार, गरीब, ज्येष्ठ नागरिकांचे संपूर्ण पालकत्व शासनाने घ्यावे, ही काळाची गरज आहे, असे मत ७३ टक्के लोकांनी नमूद केले. २0 टक्के लोकांनी गरज नाही असे नमूद केले, तर ७ टक्के याबाबत तटस्थ राहिले. पाल्याच्या लग्नानंतर घरातील वातावरण बदलते; त्यामुळे ज्येष्ठांकडे दुर्लक्ष होते, असे ५0 टक्के लोकांना वाटते. ४४ टक्के लोकांना असे वाटत नाही, तर ६ टक्के या प्रश्नाबाबत तटस्थ राहिले.
आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्यानंतर साठीनंतर ज्येष्ठ नागरिकांनी नोकरी-करिअर करावे, असे ३१ टक्के लोकांना वाटते. ६२ टक्के लोकांना ते करू नये असे वाटते, तर ७ टक्के लोकांनी याबाबत कोणतेच मत व्यक्त केले नाही. ज्येष्ठ नागरिकांनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ठेवावी, असे २९ टक्के लोकांना वाटते. ५५ टक्के लोकांनी ठेवू नये, असे मत व्यक्त केले. १६ टक्के लोकांनी याबाबत तटस्थ राहणेच पसंत केले.
■ संयुक्त कुटुंब पद्धतीच हवी
■ मुलाच्या उत्पन्नातील काही वाटा माता-पित्यांना मिळावा!
■ साठीनंतर नोकरी किंवा करिअर करण्याला विरोध
|
I’m very happy to read this. This is the type of manual that needs to be given and not the random misinformation that is at the other blogs. Appreciate your sharing this best doc.