Home > News > लोकमत हेल्लो पुणे :- मुलीने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

लोकमत हेल्लो पुणे :- मुलीने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

या मुलीने आपले अपहरण झाल्याचे सांगितल्यावर तिचे आई-वडील राजकीय कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस चौकीत आले. दबाव टाकून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले; परंतु या घटनेचा तपास केल्यावर वस्तुस्थिती निराळीच निघाली. ही मुलगीच त्यामध्ये दोषी निघाली, त्यामुळे ऊठसूठ कोणत्याही विषयावर पोलिसांवर दबाव टाकून स्टंटबाजी करणार्‍या राजकीय कार्यकर्त्यांनी पोलिसांना त्यांच्या पद्धतीने काम करू देण्याची आवश्यकता आहे. – रवींद्र फड, पोलीस उपनिरीक्षक”

 

पुणे : दहावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी मित्रासोबत फिरायला सारसबागेत गेली. घरी परतायला उशीर झाल्यामुळे आई-वडिलांनी विचारणा केल्यावर या मुलीने चक्क आपले अपहरण झाले होते, असा बनाव रचला. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपण कशीबशी सुटका करून घेतल्याचे तिने घरच्यांना सांगितले. कुटुंबीयांच्या आग्रहाखातर पोलिसांनी गुन्हा दाखल केला खरा; परंतु पोलिसांनी हा सर्व बनाव असल्याचे एकाच दिवसात उघडकीस आणले.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र फड यांनी माहिती दिली. १५ वर्षीय मुलगी शुक्रवारी सकाळी शाळेला जाते, असे सांगून अकरावीत शिकणार्‍या एका १७ वर्षीय मित्रासोबत फिरायला गेली होती. दिवसभर सारसबागेत फिरून झाल्यावर रात्री उशिरा हे दोघेही घरी परतले. मुलगी शाळेतून अद्याप घरी कशी आली नाही, यासाठी वडिलांनी शाळेत जाऊन चौकशी केली तेव्हा ती शाळेत आलीच नसल्याचे समजले. घरी काय सांगायचे, या विचारात असतानाच तिला अपहरण झाल्याचे नाटक सुचले.
एका व्यक्तीने आपल्याला बळजबरीने मोटारीत बसवून पळविले होते. त्याची नजर चुकवून स्वत:ची सुटका करून पळून आल्याचे तिने कुटुंबीयांना सांगितले. काळजीत पडलेल्या आई-वडिलांनी कोथरूड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. मुलीच्या सांगण्यातील विसंगती लक्षात आल्यावर पोलिसांनी तिला खोदून-खोदून विचारले. आई -वडिलांचा मार चुकविण्यासाठी तिने अपहरणाची कथा रचल्याचे तिने सांगितले. (प्रतिनिधी)

 

http://epaper.lokmat.com/newsview.aspx?eddate=08/05/2013&pageno=1&edition=42&prntid=30036&bxid=26315434&pgno=1

About these ads
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Fight for Justice

A crusaders blog for inspiring thought.

Stand up for your rights

Gender biased laws

MyNation Foundation - News

News Articles from MyNation, india - News you can use

498afighthard's Blog

Raising Awareness About Gender Biased Laws and its misuse In India

WordPress.com News

The latest news on WordPress.com and the WordPress community.

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 1,056 other followers

%d bloggers like this: