Home > News > दिल्ली पोलिसांना भोवली मांडवली

दिल्ली पोलिसांना भोवली मांडवली

बायकोने नवर्‍याविरुद्ध केलेल्या तक्रारीवरून मांडवली करू पाहणार्‍या दिल्लीतील दोन पोलिसांविरुद्ध कॅन्टोंन्मेट कोर्टाने सदोष मनुष्यवधाचा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
दिल्लीचे दोन सहायक पोलीस उपनिरीक्षक अनुक्रमे कृष्णा आणि प्रेमपाल यांनी दिल्लीतल्या तरुणीच्या तक्रारीवरून पुण्यात राहणारा तिचा नवरा व सासरे यांना धमक्या दिल्या. त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या मनस्तापामुळे हृदयविकाराने आजारी असलेल्या सासर्‍यांचा मृत्यू झाला. नवर्‍याची बाजू मांडणार्‍या अँड. भाग्यश्री अलाटे यांनी या प्रकरणी दिल्ली पोलिसांना न्यायालयात खेचलेआहे.
घडले ते असे – दिल्लीतील रिमा व पुण्यातील मनोज (दोघांची नावे बदलली आहेत) लग्न झाल्यानंतर नोकरीनिमित्त बंगळूरला स्थायिक झाले. तेथे मनोज व त्याच्या आई-वडिलांनी दागदागिने हिसकावून घेतले, त्रास दिला, अशी तक्रार रिमाने दिल्लीच्या रोहिणी पोलीस ठाण्यात दिली. त्याआधारे सहायक पोलीस उपनिरीक्षक अनुक्रमे कृष्णा आणि प्रेमपाल यांनी मनोज व त्याच्या वडिलांना फोनवरून धमक्या देण्यास सुरुवात केली. ‘लडकीवालों को पैसा मंगता है’, ‘कॉम्प्रमाईज कर डालो नही तो दिल्ली के चक्कर लगाने पडेंगे,’ अशा धमक्यांचे फोन दिल्ली पोलिसांकडून येऊ लागले. त्यानंतर एकदा दिल्लीचे हे दोन पोलीस ‘सर्च वॉरंट’ नसताना रिमाला घेऊन मनोजच्या पुण्यातील घरी आले व त्यांनी मनोजच्या घराची झडती घेतली. या घटनेनंतर दहाच दिवसांनी मनोजच्या वडिलांचा मृत्यू झाला.
समाजात होणारी मानहानी आणि दिल्ली पोलिसांच्या धमक्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला. मांडवलीसाठी दबाव आणला, असे आरोप अँड. अलाटे यांनी न्यायालयात केले. फोनवरून दिलेल्या धमक्यांचे रेकॉर्डिंग, घराची झडती घेत असतानाचे चित्रीकरण न्यायालयात सादर करण्यात आले. यावर दिल्ली पोलिसांनी ‘आम्ही स्वत:साठी पैसे मागितले नाहीत,’ असा बचाव केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरला नाही. दोन्ही पोलिसांविरुद्ध ३0४ व १६६ कलमांनुसार संगनमताने सदोष मनुष्यवधाला जबाबदार असल्याच्या आरोपावरून सुनावणी सुरू झाली आहे. रिमा आणि तिच्या वडिलांविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला आहे.

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=42

Categories: News Tags:
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Fight for Justice

A crusaders blog for inspiring thought.

Stand up for your rights

Gender biased laws

MyNation Foundation - News

News Articles from MyNation, india - News you can use

498afighthard's Blog

Raising Awareness About Gender Biased Laws and its misuse In India

The WordPress.com Blog

The latest news on WordPress.com and the WordPress community.

%d bloggers like this: