Home > News > होय, पत्नीकडूनही होतोय पतीचा छळ

होय, पत्नीकडूनही होतोय पतीचा छळ

कोल्हापूर – राजारामपुरीमधील एक तरुण. त्याचा विवाह दणक्‍यात झाला. विवाहानंतर त्याने “करिअर मार्गी लागेपर्यंत मूल नको’ असे ठरविले; मात्र पत्नीचा या म्हणण्याला नकार. यातून वाद वाढला. “पती त्रास देतो, छळ करतो’, असे पत्नी म्हणू लागली. अखेर प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. महिला कॉन्स्टेबलने काही चौकशी करण्यापूर्वी मुलीची बाजू घेत तरुणाला दम भरला. “पत्नीचा छळ करतोस काय..?’

शहराला लागून असलेल्या गावातील हा तरुण. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून मुंबईला नोकरी. विवाहानंतर काही दिवसांतच पत्नीने हट्ट धरला, “आपण, कोल्हापुरात राहायचे.’ आता मुंबईतली चांगली नोकरी सोडून कसं जायचं, हा प्रश्‍न त्याला पडला. म्हणून त्याने पत्नीला समजावले; पण पत्नी गेली माहेरी निघून. मग पुन्हा “पतीकडून छळ, त्रास…’ अशी तक्रार. अखेर मुंबईतली नोकरी सोडून तो कोल्हापुरात परतला.

आणखी असाच एकजण खासगी दुकानात काम करतो. त्याचा विवाह झाला. पण विवाहानंतर चौथ्या दिवशी पत्नी माहेरी गेली, ती परतलीच नाही. माहेरी पत्नी सांगते, “मला तेथे त्रास होतो.’ चारच दिवसांत तिला कसला त्रास होतो, हे त्या तरुणाला समजले नाही. पण दोष मात्र त्याच्यावरच आला.
असेच एक दाम्पत्य ताराबाई पार्क परिसरात राहणारे. पती चांगल्या ठिकाणी नोकरीला. पती नोकरीला गेला, की पत्नी घराबाहेर पडे. मनात येईल तोपर्यंत भटकत राही. पतीने सहज विचारल्यावर पत्नीने त्याला वेगळेच स्वरूप दिले. पतीने छळवाद मांडल्याचे सांगू लागली.

ही उदाहरणे आहेत कोल्हापुरातील. पतीकडून पत्नीचा छळ होत असल्याच्या तक्रारी नेहमीच होतात; पण आता पत्नीकडून पतीचा छळ होण्याच्या तक्रारी होऊ लागल्यात. या प्रकरणात चूक संबंधित महिलेची असली तरी समाजातील दबावामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात मात्र पतीलाच उभे राहावे लागते. अनेक सामाजिक संस्थांसह पोलिसांकडे अशा तक्रारी होऊ लागल्यात.

महिलांना समान न्याय व त्यांच्यावर सासरी होणारे अन्याय ही बाब गंभीर आहे. अजूनही मुलींना विवाहानंतर देण्यात येणारी वागणूक हा अनेकांना गंभीर विषय वाटतो. तसेच आता विवाहानंतर पत्नीकडून पतीला दिला जाणारा त्रास हादेखील सामाजिक प्रश्‍न बनत आहे.

यातील बहुतेक प्रकरणांत प्रामुख्याने मुलींची इच्छा विचारात न घेता आई-वडिलांनी विवाह करून दिल्याचे दिसते.

विवाहापूर्वी सर्व बाबींची सुस्पष्ट चर्चा किंवा आपल्यातील कमतरतेची कल्पना दिल्यास यातून मार्ग काढता येतो. पण विवाहानंतर हे सर्व सुरू झाल्यास दोघांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो.

महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात काम करणाऱ्या “दिलासा’ सामाजिक संस्थेच्या डॉ. रूपा शहा म्हणाल्या, “”पतीचाही छळ होतोय, हे वास्तव आहे. अलीकडील काळात त्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. यामध्ये पत्नीने पतीला मारहाण केल्याची उदाहरणेही आहेत. पारंपरिक रूढीनुसार, महिलांचा छळ होतो, ही बाब खरी असली तरी, आता पतीला त्रास दिला जातो, हेही खरे आहे. आमच्याकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये दहापैकी तीन तक्रारी पतींच्या आहेत.”
शहा म्हणाल्या, “”पत्नीला कितीही समजावले तरी संबंधित महिला पतीला समजून घेऊन संसार चालवण्यासाठी ऍडजेस्टमेंट करताना दिसत नाही. यातून मार्ग काढताना पतीचा छळ करणाऱ्या पत्नीपासून वेगळे होऊन दुसऱ्या, सासरकडून छळाला कंटाळलेल्या, पतीपासून विभक्त झालेल्या महिलेसोबत विवाह करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्यामुळे दोघेही पुन्हा सुखी होऊ शकतात.”

आकडे बोलतात
कोल्हापूर पोलिस महिला दक्षता समिती (10 ऑगस्ट 2011 पर्यंत)
एकूण तक्रारी – 165
महिलांच्या – 120
पुरुषांच्या – 45
(ही माहिती फक्त पोलिसांतील आहे. खासगी संस्थांकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये 10 पैकी तीन तक्रारी पुरुषांच्या)

वास्तवाचे भान ठेवावे
लग्नापूर्वी मुलीला स्वयंपाक व अन्य गोष्टी येत नसल्या तरी सासरच्या लोकांकडून ते लपवून ठेवले जाते. मुलगी शहरात राहणारी आणि विवाह खेडेगावातील तरुणाबरोबर झाला तर ती सासरी राहायला तयारच होत नाही. अनेक दूरचित्रवाणीवर दाखवल्या जाणाऱ्या विविध मालिकेतून दिसणाऱ्या काल्पनिक गोष्टींचा त्यांच्यावर होणारा परिणाम, या बाबी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

 

http://www.esakal.com/esakal/20110914/5315431026251946979.htm

Advertisements
Categories: News Tags:
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Fight for Justice

A crusaders blog for inspiring thought.

Stand up for your rights

Gender biased laws

MyNation Foundation - News

News Articles from MyNation, india - News you can use

498afighthard's Blog

Raising Awareness About Gender Biased Laws and its misuse In India

The WordPress.com Blog

The latest news on WordPress.com and the WordPress community.

%d bloggers like this: