Home > IMD > खट्याळ सासवांमुळे जावई हैराण!- Lokmat

खट्याळ सासवांमुळे जावई हैराण!- Lokmat

http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=PuneEdition-4-4-19-11-2011-53668&ndate=2011-11-19&editionname=pune

 

 

पुणे। दि. १८ (प्रतिनिधी)
हुंड्यासाठी सासू, नवरा व सासरच्या लोकांनी छळ केला.. जाळून मारले.. विहीरीत ढकलून दिले अशा बातम्या एव्हाना आपल्याला सवयीच्या झालेल्या आहेत. मात्र बदलत्या काळानुसार यामध्येही बदल होत असल्याची माहिती पुढे आली आहे. नव्या पिढीतील अनेक नवरे घरामध्ये त्यांच्या सासूच्या वाढलेल्या हस्तक्षेपाने हैराण झाले आहेत. तंत्रज्ञान क्रांतीचे फलित असलेल्या ‘मोबाइल’ने हा घोटाळा
होत आहे.
पुणे पोलिसांच्या वतीने महिला सहाय्यता कक्ष चालविला जातो. पोलीस ठाण्यांमध्ये कौटुंबिक तक्रारी देण्यासाठी येणार्‍या महिला व पुरूषांना प्रथम येथे समुपदेशनासाठी पाठविले जाते. सध्या पोलीस निरीक्षक स्मिता जाधव या विभागाचे काम सांभाळत आहेत. या विभागामध्ये १५ तज्ज्ञ समुपदेशकांची टीम
कार्यरत आहे.
महिला सहायता कक्षाकडे तक्रार दाखल करण्यामध्ये महिलांबरोबरच पुरूषांची संख्याही मोठयाप्रमाणात वाढत आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर २0१0 या काळात एकूण १0५९ तक्रारी सहायता कक्षाकडे दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये पुरूषांकडून तक्रार अर्ज दाखल होण्याची संख्या फक्त ८९ इतकी होती. मात्र या वर्षी यामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. ऑक्टोबर अखेर ९८३ तक्रारी सहायता कक्षाकडे आल्या आहेत. त्यामध्ये पुरूषांच्या तक्रारींची संख्या २४0 इतक्या मोठया प्रमाणात
वाढली आहे.
पुरूषांकडून येणार्‍या तक्रारींमध्ये पत्नीच्या माहेरकडच्या लोकांचा वाढता हस्तक्षेप ही या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. सगळयांच्या हातामध्ये आता सर्रास मोबाइल आलेले आहेत. आणि तो स्वस्ताही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे साहजिकच मुलींकडून माहेरी फोन करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही प्रकरणामध्ये अगदी दोन-दोन तासाला बायको माहेरी फोन करत असते अशा तक्रारी नवर्‍यांकडून आल्या आहेत. एका प्रकरणामध्ये माहेरी सतत फोन करणार्‍या बायकोचे मोबाइल बिल महिना साडे चार हजार तर घरातील उर्वरित सगळयांचे मिळून दीड हजार रूपये इतके येत असल्याची तक्रार आली आहे. त्यातून सासू व इतर लोकांचा घरामध्ये हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे वैतागलेल्या पतीराजांनी महिला सहायता कक्षाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याखालोखाल पत्नीचे अनैतिक संबंध, संशय या कारणावरून पुरूषांकडून सहायता कक्षाकडे तक्रार अर्ज आले आहेत. मुली शिकल्याने आता ‘‘नवरा म्हणेल ती पूर्व दिशा’ म्हणायला त्या तयार नाहीत.
सहायता कक्षातील समुपदेशक दोघा पती-पत्नींना समोरासमोर बसवून परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामार्फत पती-पत्नींमध्ये तडजोड घडवून संसार सुरळित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांचे प्रयत्न असफल ठरल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करून घेतली जाते अथवा घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये जाण्याचा त्यांना सल्ला दिला जातो. २0१0 मध्ये दाखल एक हजार प्रकरणामध्ये १९२ कुटुंबांचा तुटलेला संसार सुरळित करण्याचे काम सहायता कक्षाने केले. या वर्षी ऑक्टोबर पर्यंत दाखल ९८३ पैकी ९४ संसार मार्गावर आणले आहेत.

Advertisements
Categories: IMD
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Fight for Justice

A crusaders blog for inspiring thought.

Stand up for your rights

Gender biased laws

MyNation Foundation - News

News Articles from MyNation, india - News you can use

498afighthard's Blog

Raising Awareness About Gender Biased Laws and its misuse In India

The WordPress.com Blog

The latest news on WordPress.com and the WordPress community.

%d bloggers like this: