Home > IMD, News > पुरुषांनाही स्वत:चा दिवस साजरा करण्याची गरज का?-

पुरुषांनाही स्वत:चा दिवस साजरा करण्याची गरज का?-

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?edorsup=Sup&queryed=21&querypage=7&boxid=26932668&parentid=9990&eddate=11/23/2011

 

आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस नुकताच साजरा झाला. आतापर्यंत आपल्याला आंतरराष्ट्रीय महिला दिन तेवढा ठाऊक होता. पण गेल्या काही वर्षात जगभरात सेलिब्रेट केल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानेही आता जनमानसाचे लक्ष वेधून घेण्यास भाग पाडले आहे. पुरुषांनाही असा स्वत:चा दिवस साजरा करण्याची गरज का पडली? या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यास अगदी प्राचीन काळापासून आपली पुरुषप्रधान समाजव्यवस्था आणि या व्यवस्थेत स्त्रियांच्या परिस्थितीचा विचार करावा लागेल.
अगदी रामायण-महाभारत काळापासून अस्तित्वात असलेल्या आपल्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने स्त्रीला कायम दुय्यम वागणूक दिली आहे. शिक्षणाची कवाडे खुली झाल्यानंतर स्त्रिया चूल आणि मूल यातून बाहेर पडल्या. अर्थार्जन करून संसाराला आर्थिक हातभार लावू लागल्या. तरी निसर्गदत्त सोशिकपणामुळे स्त्रीच्या यातना काही कमी झाल्या नाहीत. हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून होणारे शारीरिक आणि मानसिक अत्याचार, प्रसंगी तिचा बळी देणे, अत्याचारातून मुक्ती मिळविण्यासाठी आत्महत्या यातून तिला संरक्षण देण्यासाठी शासनाने ४९८ अ हे कायद्याचे नवीन कलम लागू केले. या कायद्यामुळे हुंड्यासाठी छळल्या जाणार्‍या स्त्रियांना जीवदान मिळू लागले. काळ बदलला. स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण वेगाने वाढू लागले. केवळ पुरुषांचेच वर्चस्व असलेली अनेक क्षेत्रे त्यांनी काबीज केली. त्यांना त्यांच्या सार्मथ्याची जाणीव झाली आणि येथेच स्त्री-पुरुष संघर्षाची बीजे रोवली गेली.
हळूहळू स्त्रियांकडून पुरुषांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना कानावर येऊ लागल्या. ४९८ या कायद्याचा स्त्रिया ढाल म्हणून नव्हे तर तलवार म्हणून उपयोग करीत असल्याचे निदर्शनास येऊ लागले. दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोड नसलेला असा हा कायदा असल्याने या कायद्याचा त्या गैरवापर करू लागल्या. कजाग स्त्रिया पती व सासरच्या लोकांविरुद्ध कुठलीही खोटी तक्रार करून त्यांना छळू लागल्या. अनेक निरपराध पुरुष व त्यांचे कुटुंबीय पोलीस आणि कायद्याच्या कचाट्यात नाहक भरडले जाऊ लागले. त्यामुळे पत्नीपीडित पुरुषांचा प्रश्नही गंभीर होऊ लागला. १९९0 नंतर या कलमाचा गैरवापर होण्याच्या घटना वेगाने घडू लागल्या. याच दशकात देशभरात पुरुष हक्क संरक्षणासाठी लढणार्‍या संघटना उदयाला आल्या. नागपुरातही १९९१ मध्ये पत्नीपीडित पुरुष मंच आणि स्त्री अत्याचार पीडित पुरुष विकास संस्था या दोन संघटना स्थापन झाल्या. या संघटनांतर्फे तेव्हा पत्नीपीडितांच्या सभा, बैठका, निदर्शने आदी कार्यक्रम राबविण्यात यायचे. पण दोन दशकांपूर्वी स्त्रियांकडून पुरुषांचा शारीरिक आणि मानसिक छळ ही गोष्टच हसण्यावारी नेली जायची. त्यामुळे या संघटनांचे आंदोलन नेहमीच अयशस्वी ठरले.
मात्र २00५ मध्ये बंगलोर येथे सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशनची (सिफ) स्थापना झाली. इंटरनेटच्या माध्यमाने अनेक पत्नीपीडित पुरुष या संघटनेशी जुळले. आज ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. संघटनेचे मध्य भारताचे अध्यक्ष राजेश वखारिया नागपुरात राहतात. या संघटनेच्या देशात ३५ शाखा आहेत. संघटनेतर्फे दरवर्षी ८ मार्च या जागतिक महिला दिनाला निदर्शने केली जातात. आपल्या पत्नीच्या निषेधार्थ जागतिक पुरुष दिन, फादर्स डे हे दिवस देखील संघटनेतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करून साजरे केले जातात. सिफतर्फे अखिल भारतीय सासू सुरक्षा मंच (ऑल इंडिया मदर इन ला प्रोटेक्शन फोरम) देखील ऑक्टोबर २00९ मध्ये स्थापन करण्यात आला. सर्व सदस्य पुरुषांच्या आया या फोरमच्या सदस्य आहेत. या मंचतर्फेही जागतिक महिला दिनाला निदर्शने केली जातात. राष्ट्रीय महिला आयोग व कायद्यांचा धिक्कार केला जातो. सिफतर्फे विभक्त आईवडिलांच्या मुलांकरिता चाईल्ड राईटस् इनिशिएटीव्ह फॉर शेअर्ड पॅरेंटींग ही संस्थासुद्धा १४ नोव्हेंबर २00८ ला स्थापन करण्यात आली. यादिवशी सिफचे सदस्य आमच्या मुलांना आम्हाला भेटू द्या या मागणीचे निवेदन न्यायालयाला देतात. मात्र अल्पवयीन मुलांचा ताबा आईकडेच राहात असल्याने त्यांना आपल्या मुलांनाही भेटता येत नाही. त्यामुळे मग यादिवशी सिफचे सदस्य अनाथालयाला भेट देऊन तेथील मुलांना मिठाई व कपडे देतात. यावर्षी यादिवशी रक्तदान शिबिर घेतल्याचे वखारिया यांनी सांगितले. भारतीय राज्यघटनेत स्त्री-पुरुष समान असल्याचे म्हटले आहे. मग स्त्री पुरुषांसाठी समान कायदे का नाहीत असा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे कायदे बदलायला हवे किंवा पुरुषांनाही संरक्षण देणारा कायदा हवा अशी त्यांची मागणी आहे. आता या पत्नीपीडितांच्या प्रश्नाकडे सार्‍या जगाचे लक्ष वेधल – वर्षा तुपकर

Advertisements
Categories: IMD, News Tags: ,
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Fight for Justice

A crusaders blog for inspiring thought.

Stand up for your rights

Gender biased laws

MyNation Foundation - News

News Articles from MyNation, india - News you can use

498afighthard's Blog

Raising Awareness About Gender Biased Laws and its misuse In India

The WordPress.com Blog

The latest news on WordPress.com and the WordPress community.

%d bloggers like this: