Home > IMD, News > पुण्यात दररोज एक पुरुष करतोय आत्महत्या-Lokmat-Hello Pune

पुण्यात दररोज एक पुरुष करतोय आत्महत्या-Lokmat-Hello Pune

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?edorsup=Sup&queryed=42&querypage=1&boxid=25615094&parentid=5397&eddate=11/28/2011

 

महिलांपेक्षा पुरुषांचा टक्का दुपटीहून अधिक
१0 वर्षांत साडेपाच हजार जणांनी केली आत्महत्या

१८ ते ३0 वयोगटातील पुरुष शारीरिक बळावर आपल्यावरील ताण सहन करू शकतो. पुढे ही शारीरिक ताकद कमी होते. कुटुंबाचा कर्ता म्हणून आपल्याकडे अजूनही पुरुषांकडेच पाहिले जात असल्याने ३0 ते ५0 या वयात हे ताणतणाव पुरुष पेलू शकत नसल्याने आत्महत्येचे प्रमाण जास्त असते.
-आरती पेंडसे
मानसोपचारतज्ज्ञ पुणे। दि. २७ (प्रतिनिधी)
पुरुषप्रधान संस्कृतीत आपल्याकडे विविध पातळय़ांवर होणार्‍या जाचामुळे महिलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे मानले जाते. पण आत्महत्या करण्यामध्ये महिलांच्या दुपटीहून अधिक पुरुष आत्महत्या करीत असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात गेल्या १0 वर्षांत ५५४८ जणांनी वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या केली. त्यात तब्बल ३८५१ पुरुषांचा समावेश असून, १६९५ महिलांनी आत्महत्या केली. पुण्यात दररोज किमान एक पुरुष आत्महत्या करीत असल्याचे समोर आले आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षी ६४६ जणांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यात ४३२ पुरुष व २१५ महिलांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक ४५८ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. याशिवाय रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाणही अधिक आहे. मात्र, त्यांची माहिती यात समाविष्ट करण्यात आलेली नाही. आत्महत्या करणार्‍या पुरुषांमधील वयोगट पाहिल्यास ३0 ते ५0 वर्षांदरम्यान जास्त प्रमाण, तर या उलट महिलांमध्ये १८ ते ३0 वयोगटात जास्त आढळून आले आहे. पुरुषाकडे कर्ता पुरुष म्हणून पाहिले जाते. कुटुंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी आपली आहे, अशी भावना त्या पुरुषाची व समाजाची असते. बेकारीमुळे आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाणही जास्त आहे. मात्र, बेकारीमुळे महिलांनी आत्महत्या केल्याचे एखादेच उदाहरण आहे. या आत्महत्यांच्या कारणांमध्ये पती-पत्नींमधील भांडणे, गरिबी, प्रेमप्रकरण आणि नापास झाल्यामुळे आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी मागितलेल्या माहितीतून हे वास्तव समोर आले आहे. वर्ष पुरुष स्त्रिया एकूण
२00१ ३३७ १४७ ४८४
२00२ ३४४ १५२ ४९६
२00३ ३६१ १४६ ५0७
२00४ ४00 १५0 ५५0
२00५ ३४५ १६१ ५0६
२00६ ३८२ १४७ ५२९
२00७ ४१२ १६९ ५८१
२00८ ४0६ १९५ ६0१
२00९ ४३५ २१३ ६४८
२0१0 ४३१ २१५ ६४६
एकूण ३८५३ १६९५ ५५४८ १८ ते ३0 वयोगटातील पुरुष शारीरिक बळावर आपल्यावरील ताण सहन करू शकतो. पुढे ही शारीरिक ताकद कमी होते. कुटुंबाचा कर्ता म्हणून आपल्याकडे अजूनही पुरुषांकडेच पाहिले जात असल्याने ३0 ते ५0 या वयात हे ताणतणाव पुरुष पेलू शकत नसल्याने आत्महत्येचे प्रमाण जास्त असते.
-आरती पेंडसे
मानसोपचारतज्ज्ञ

Advertisements
Categories: IMD, News
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Fight for Justice

A crusaders blog for inspiring thought.

Stand up for your rights

Gender biased laws

MyNation Foundation - News

News Articles from MyNation, india - News you can use

498afighthard's Blog

Raising Awareness About Gender Biased Laws and its misuse In India

The WordPress.com Blog

The latest news on WordPress.com and the WordPress community.

%d bloggers like this: