Home > News > नवर्‍यांनो, सावधान !———-LOKMAT

नवर्‍यांनो, सावधान !———-LOKMAT


नवर्‍यांनो, सावधान !

यकोला पोसता येत नसेल तर लग्नच करू नका’ हा मुंबई उच्च न्यायालयाने पुरुषवर्गाला दिलेला आदेश देशातील स्त्रियांसाठी उत्साहवर्धक तर पुरुषांसाठी चिंतावर्धक आहे. लग्न करायचे तर किमान ते टिकेपर्यंत बायकोचा सांभाळ करायचा, ते तुटले तर तिला पोटगीदाखल पैसा पुरवायचा आणि तो पुरविता येत नसेल तर गरिबी वा तसे कोणतेही कारण त्यासाठी पुढे करायचे नाही असा या आदेशाचा तीन पदरी सांगावा आहे. तात्पर्य, आताच्या सगळ्य़ा नवर्‍यांना व पुढे नवरे होऊ इच्छिणार्‍या सार्‍या तरुणांना आपली ऐपत वाढविण्याची, टिकविण्याची व प्रसंगी ती वाटून घेण्याची तयारी यापुढे करावी लागणार आहे. कुठल्याशा वाहिनीवर मालिका दिग्दर्शित करणार्‍या इसमाने त्याच्या पत्नीला लग्नानंतर दहा वर्षांनी घटस्फोट द्यायचे ठरविले तेव्हा तिने त्याला दहा लाखांचा मोबदला मागितला. त्यातून उभ्या झालेल्या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने हा दणदणीतआदेश सार्‍या पुरुषवर्गाला दिला. गेली सात वर्षे ते दोघे एकमेकांपासून फारकत घेऊन दूर राहत होते. या काळात कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार त्या नवर्‍याने बायकोला दरमहा सहा हजार रुपये खर्चादाखल द्यायचे होते. काही काळ ते दिल्यानंतर त्या बहाद्दराने तो रतीब थांबविला. परिणामी त्याच्याकडे पावणेदोन लाखांची थकबाकी राहिली. या थकबाकीचे कारण न्यायालयाला सांगताना त्या नवर्‍याने आपण गरीब असून आपल्याला पूर्वीएवढे उत्पन्न मिळत नाही असा स्वत:चा बचाव केला. तो फेटाळून लावताना ‘गरीब असणे हे पोटगी न देण्याचे कारण ठरू शकत नाही’ असे न्यायालयाने त्याला बजावले वर ‘गरीबच होता तर लग्न केलेच कशाला’ असेही त्याला सुनावले. लग्न केलेल्या व करणार्‍या कोणत्याही पुरुषाला आपण बायकोचा सांभाळ करू शकत नाही असे म्हणण्याचाअधिकार नसल्याचेही यावेळी न्यायालयाने जाहीर केले. न्या. पी.बी. मुजुमदार व न्या.अनुप मोहता यांच्या बेंचने दिलेला हा निर्णय एकाचवेळी विवाहित स्त्रीला संरक्षण देणारा, पत्नीची आर्थिक जबाबदारी टाळू पाहणार्‍या नवर्‍यांना दम देणारा आणि लग्नात व लग्नानंतरही स्त्रीला आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा आहे. मुंबईचे खंडपीठ स्त्रियांना सबलीकरणाचा हात देणारा हा निर्णय देत असतानाच त्या न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘नवर्‍याला सोडून परपुरुषासोबत राहणार्‍या (लिव्ह इन रिलेशनशिप) स्त्रीला त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर पोटगी देण्याची जबाबदारी पुन्हा नवर्‍यावरच येते’असा निर्णय देऊन स्त्रियांची बाजू आणखी भक्कम केली आहे. न्या. ए. व्ही. निरगुडे यांच्या या निकालाने ४९ वर्षे वयाच्या नवर्‍याचा, आपल्याला सोडून परपुरुषाबरोबर रहायला गेलेल्या बायकोला पोटगी न देण्याचा दावा फेटाळून लावला आहे. ‘परपुरुषासोबतचा तिचा सहवास कोणत्याही कारणाने संपला असेल आणि आपण निराधार असल्याचे ती सिद्धकरीत असेल तर तिचा पोटगीचा हक्क कायम राहतो’ असे या न्यायालयाने म्हटले आहे.. औरंगाबादचे खंडपीठ आणि मुंबईचे उच्च न्यायालय यांनी एकाचवेळी दिलेले हे दोन निकाल स्त्रीशक्ती वर्धमान करणारे आणि पुरुषांना लग्नाआधी, लग्नानंतर व ते संपुष्टात आल्यानंतरही कायम सावधान रहायला सांगणारे आहेत. या निर्णयावर महाराष्ट्रातील महिलांच्या संघटनांच्या प्रतिक्रिया अजून प्रगट झाल्या नसल्या तरी त्या केवढय़ा आनंदाच्या असतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

Categories: News Tags:
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Fight for Justice

A crusaders blog for inspiring thought.

Stand up for your rights

Gender biased laws

MyNation Foundation - News

News Articles from MyNation, india - News you can use

498afighthard's Blog

Raising Awareness About Gender Biased Laws and its misuse In India

The WordPress.com Blog

The latest news on WordPress.com and the WordPress community.

%d bloggers like this: