Home > Maintainace in DV Act, News > तरुणीचा अंतरिम पोटगीचा अर्ज फेटाळला—लोकमत -हेल्लो पुणे

तरुणीचा अंतरिम पोटगीचा अर्ज फेटाळला—लोकमत -हेल्लो पुणे

कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर करत एका प्राध्यापकाविरुद्ध तरुणीने दाखल केलेला अंतरिम पोटगीचा अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. पी. मारुलकर यांनी फेटाळला.
अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक चंद्रकांत कुंजीर यांच्याविरुद्ध एका तरुणीने हा तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जानुसार या तरुणीने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना कुंजीर हे तिला प्राध्यापक होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले व कुंजीर यांना पहिली पत्नी व दोन मुले असतानाही त्यांनी आपल्याशी लग्न केले होते. प्राध्यापकांनी पहिल्या लग्नाची गोष्ट लपविली होती. त्यामुळे आपली फसवणूक व छळ झाल्याने अंतरिम पोटगी द्यावी, असा अर्ज तरुणीने दाखल केला होता.
या प्रकरणी कुंजीर यांच्या वतीने अँड. सुप्रिया कोठारी यांनी युक्तिवाद केला. तरुणीचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी दिली होती. यावर याच महिलेने त्यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. या तरुणीने आपले एका युवकाशी प्रेमसंबंध होते व त्याला घरच्यांचा विरोध होता त्यासाठी कुंजीर आपल्याला मदत करीत होते. ते आपल्यासाठी आदरणीय शिक्षक असून, शुभचिंतक आहेत. यापेक्षा अधिक त्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही अशा आशयाचे पत्र तिने महाविद्यालय प्रशासन आणि घरच्यांना पाठविले होते. ते पत्र कोठारी यांनी न्यायालयात सादर केले. तिने वेळोवेळी पाठविलेल्या ई-मेल आणि पत्रांनाही प्राध्यापकाने कोणताच प्रतिसाद दिला नसल्याचेही न्यायालयासमोर सिद्ध केले.
न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे की, कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये महिलेने ज्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे त्या व्यक्तीशी घरगुती संबंध असणे आणि त्याच्याकडून हिंसाचार होणे तसेच उच्च न्यायालयाच्या काही आदेशानुसार ‘घरगुती’ किंवा ‘कौटुंबिक’ नाते हे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सुद्धा असू शकते. या प्रकरणामध्ये या तरुणीचे व कुंजीर यांचे कौटुंबिक नाते होते किंवा ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये होते हे सिद्ध होत नसल्याने न्यायालयाने तरुणीचा अर्ज फेटाळला.

http://epaper.lokmat.com/newsview.aspx?eddate=06/26/2012&pageno=2&edition=42&prntid=13545&bxid=25644578&pgno=2

  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Fight for Justice

A crusaders blog for inspiring thought.

Stand up for your rights

Gender biased laws

MyNation Foundation - News

News Articles from MyNation, india - News you can use

498afighthard's Blog

Raising Awareness About Gender Biased Laws and its misuse In India

The WordPress.com Blog

The latest news on WordPress.com and the WordPress community.

%d bloggers like this: