Home > Divorce, News > पतीला जन्मदात्यांपासून दूर करणे क्रूरताच ——Lokmat

पतीला जन्मदात्यांपासून दूर करणे क्रूरताच ——Lokmat

आपली पत्नी भांडखोर, तापट आणि आत्मप्रौढी आहे. लग्नात आपण हुंडा मागितल्याचा आरोप खोटा आहे. उलट आपणच लग्नात मदत म्हणून १५ हजार रुपये आपल्या सासर्‍याला दिले होते. आपली पत्नी भांडखोर, तापट आणि आत्मप्रौढी आहे. लग्नात आपण हुंडा मागितल्याचा आरोप खोटा आहे. उलट आपणच लग्नात मदत म्हणून १५ हजार रुपये आपल्या सासर्‍याला दिले होते. पती वृद्ध माता-पित्याचा एकुलता एक मुलगा आहे, याबाबतची जाणीव असतानाही आणि या वृद्ध सासू-सासर्‍याकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याची पोलीस किंवा अन्य कुणाहीकडे तक्रार नसताना, कोणत्याही योग्य कारणाशिवाय पतीला माता-पित्यापासून वेगळे राहण्याची पत्नीने केलेली अवाजवी मागणी ही क्रूरता होय,असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आणि कुटुंब न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवून, भावनाचे अपील खारीज केले. राहुल अवसरे। दि. २६ (नागपूर)
वृद्ध माता-पित्यापासून पतीला दूर करणे ही क्रूरता होय, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठाच्या न्या. वासंती नाईक आणि न्या. अरुण चौधरी यांच्या खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला. क्रूरतेच्या आधारावर कुटुंब न्यायालयाने पतीच्या बाजूने दिलेला घटस्फोटाचा आदेश योग्य ठरवून या निर्णयाविरुद्ध पत्नीने दाखल केलेले पहिले अपील फेटाळून लावले.
या प्रकरणी अधिक माहिती अशी, वर्धा मार्गावरील पावनभूमी येथे राहणारा विजयकुमार हा सार्वजनिक क्षेत्र उपक्रमात इंजिनियर आहे. त्याचा विवाह २५ मे २00१ रोजी भावनासोबत झाला होता. भावना ही देखील उच्चशिक्षित आहे. विजयकुमार याने पत्नीपासून घटस्फोट मिळावा म्हणून कुटुंब न्यायालयात हिंदू विवाह अधिनियम १९५५ च्या कलम १0 आणि १३ अंतर्गत एक याचिका दाखल केली होती. विजयकुमारने याचिकेत असे नमूद केले होते की, आपली पत्नी दर पंधरवड्यानंतर कोणतेही कारण नसताना क्षुल्लक कारणांवरून आपल्याशी आणि आपल्या आई-वडिलांशी भांडण करीत असते. आपण कामानिमित्त महिन्यातून १४ दिवस बाहेर असतो. घरी परतल्यानंतर आपले स्वागत भांडण आणि गार्‍हाणीने होत होते. पती, सासू-सासरे आणि नणंदांकडून आपला मानसिक व शारीरिक छळ होत आहे, असा आरोप करून भादंविच्या कलम ४९८-अ अंतर्गत कारवाई करण्याची धमकीही आपली पत्नी देत असते. ती आपणास कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्या मागे वारंवार माहेरी निघून जाण्याच्या सवयीची आहे. अनेक दिवस ती माहेरीच राहाते. त्यामुळे आपली आणि कुटुंबाची मोठी गैरसोयहोत असते.
जानेवारी २00५ मध्ये भांडण होताच आपल्या पत्नीने आत्महत्या करण्याची व कुटुंबीयांना फसवण्याची धमकी दिली होती. नोव्हेंबर २00४ मध्ये तिने एका साक्षगंधाच्या कार्यक्रमात विनाकारण आपल्या आईसोबत भांडण केले होते. आपण तिला शांत करण्याचा प्रयत्न केला असता रान उठवले होते. त्याही वेळी तिने आपल्या वडिलाला आणि भावाला बोलावले होते. त्यानंतर त्यांनीही आपल्या कुटुंबाला ४९८-अ गुन्ह्यात फसवण्याची धमकी दिली होती.
भावनाने कुटुंब न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या लिखित उत्तरात पतीने केलेले दावे आणि आरोप फेटाळले होते. आपल्या पतीची वर्तणूक बरोबर नाही. आपणास शेजार्‍यांसोबत बोलू दिले जात नाही. सासरचे लोक लोभी आहेत. हुंड्याची मागणी करतात. सासरच्या लोकांनी आपले जगणे मुश्किल करून आपणास माहेरी जाण्यास भाग पाडले. आपला पती जर आपल्या आई-वडिलांपासून वेगळा होऊन राहात असेल तर आपली त्याच्यासोबत संसार करण्याची इच्छा आणि तयारी आहे, असेही तिने उत्तरात म्हटले होते.
कुटुंब न्यायालयाने साक्षीपुराव्याच्या आधारावर २ जुलै २00८ रोजी या हिंदू विवाह याचिकेत विजयकुमार याच्या बाजूने घटस्फोटाचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरुद्ध भावना हिने उच्च न्यायालयात पहिले अपील दाखल केले होते. त्यावर दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद झाला.
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Fight for Justice

A crusaders blog for inspiring thought.

Stand up for your rights

Gender biased laws

MyNation Foundation - News

News Articles from MyNation, india - News you can use

498afighthard's Blog

Raising Awareness About Gender Biased Laws and its misuse In India

The WordPress.com Blog

The latest news on WordPress.com and the WordPress community.

%d bloggers like this: